Breaking News

पीपीई किटसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून 50 लाखांचा निधी

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीच्या या काळात नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किटसाठी 50 लाख रुपयांचा आमदार निधी दिला आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळच्या आपत्कालीन परिस्थितीत गोरगरीब, गरजू तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत केली आहे. सध्याच्या कोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीतही त्यांनी लाखो लोकांना अन्नधान्य, तयार भोजन, मास्क, रोगप्रतिकारक गोळ्या, सॅनिटायझर असे आवश्यक साहित्य दिले. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावे, यासाठी स्वतः आणि सहकार्‍यांच्या मार्फत पाठपुरावा
व मदतकार्य सुरू आहे.
कोविड-19 संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 50 लाख रुपयांचा निधी आपल्या आमदार निधीतून विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांचा 50 लाखांचा हा आमदार निधी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किट खरेदीसाठी वापरण्यात येणार आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply