खोपोली : प्रतिनिधी
कोरोनाची पार्श्वभूमी व लॉकडाऊन असल्याने मार्चपासून मे महिन्यापर्यंत तीन महिने सरासरीवर आधारित ऑनलाइन वीज बिले देण्यात आली. त्यानुसार बहुसंख्य ग्राहकांनी ती भरली, मात्र जून महिन्यात रीडिंगनुसार वीज बिल वितरित करताना मागील भरलेली बिलाची रक्कम ग्राह्य न धरता सरसकट तीन महिन्यांच्या सरासरीनुसार एकत्रित वीज बिले देण्यात आली आहेत. ही बिले तीन हजारांपासून 28 हजार एवढी असल्याने ग्राहकांत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट असताना अव्वाच्या सव्वा वीज बिले आल्याने ग्राहकांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भरलेली बिले वजा करून एक महिन्याचे स्वतंत्र बिल देण्याची मागणी होत आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper