Breaking News

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अमली पदार्थविरोधी ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून तिचा ड्रग्ज डीलर्सशी संपर्क असल्याचे नुकतेच समोर आले होते. तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचे बोलले जाते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होताहेत. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीसंदर्भात नुकताच अमली पदार्थ सेवनाबाबतचा नवा मुद्दा समोर आला. याबाबत ईडीने रियाचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट नुकतेच सीबीआयसोबत शेअर केले. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने यात ड्रग्जचा वापर व व्यापार झाल्याचा ठपका ठेवला होता. रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून ती ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर सुशांतलाही तिने याचे सेवन करण्याबाबत सूचना केल्याचे बोलले जात आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply