Breaking News

अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू

खोपोली ः प्रतिनिधी

खंडाळा घाटात मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे जुळतात त्याअगोदर असलेल्या अंडा पॉइंट येथे बुधवारी (दि. 2) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत खोपोली पोलिसांत नोंद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बाजूकडून मुंबईकडे जात असलेला कंटेनर अंडा पॉइंट वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. यात कंटेनर क्लिनर सूरज बघेल (27, रा. छत्तीसगड) याचा मृत्यू झाला, तर कंटेनरचालक राजू भुवरसिंग बघेल (32) याने वेळीच गाडीबाहेर उडी मारल्याने तो बचावला आहे. यासंदर्भात खोपोली पोलिसांनी सविस्तर चौकशीसाठी चालकास ताब्यात घेतले आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply