Breaking News

पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम, जनजागृती पथनाट्य व वृक्षारोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग 17, 19 आणि 20मध्ये स्वच्छता मोहीम, जनजागृतीपर पथनाट्य तसेच वृक्षारोपण उपक्रम महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आले.  
सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेवक मनोज भुजबळ, माजी उपमहापौर व नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, नगरसेविका रूचिता लोंढे, सुशिला घरत, माजी नगरसेवक जगदिश गायकर, जगदिश घरत, रघुनाथ बहिरा, प्रभाग अध्यक्ष पवन सोनी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, संजय जैन, चिटणीस सुनील खळदे, हारुशेठ भगत, चंद्रकांत मंजुळे, दत्ता पाटील, यतीन देशमुख, राजू कोळी, सागर बहिरा, नैनेश वाघिलकर, वसंत पगडे, संतोष अपसिंगेकर, जितेंद्र खुटकर, अफताब ताडे, हरून शेख, किरण बहिरा, गौरी पवार, मनीषा चिले, आदी उपस्थित होते.
सेवा सप्ताहानिमित्त प्रभाग 17मध्ये स्वच्छता मोहीम आणि प्लॅस्टिकमुक्ती जनजागृती पथनाट्य, प्रभाग 19मध्ये मार्केट यार्ड परिसरात स्वच्छता मोहीम, छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्लॅस्टिकमुक्ती जनजागृती पथनाट्य आणि प्रभाग 20मध्ये स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply