पनवेल : वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून सेवा सप्ताह राबवला जाणार आहे. याअंतर्गत बुधवारी खांदा वसाहतीत पक्षाच्यावतीने स्वच्छता अभियान घेऊन पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात आल्या. मोकळ्या भूखंडावर जेसीबी आणि डंपरच्या माध्यमातून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे परिसर स्वच्छ झालेला आहे. पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सेवासप्ताह प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खांदा वसाहतीत बुधवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रभाग समिती सभापती संजय भोपी, पक्षाचे खांदा कॉलनी अध्यक्ष नगरसेवक एकनाथ गायकवाड, ज्येष्ठ नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी भाजपचा झेंडा दाखवून या अभियानाला सुरुवात केली. टीआयपीएल कंपनीच्या माध्यमातून डंपर आणि जेसीबी पुरविण्यात आले होते. सकाळी सुरू झालेल्या या अभियानात मोकळा भूखंडावरील डेब्रिज, पडलेल्या झाडांच्या फांद्या, झाडांचे खोड, पालापाचोळा त्याचबरोबर कचरा उचलण्यात आला. यावेळी रामनाथ पाटील, शांताराम महाडिक
गोपीनाथ मुंडे, प्रकाश खानावकर, चेतन जाधव, नवनाथ मेंगडे, सचिन गायकवाड, संजय कांबळे, प्रवीण भोसले जामले उपस्थित होते.
उरण : वार्ताहर
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरण यांच्या वतीने स्वच्छता अभियान व प्लास्टिक मुक्ती संकल्प शिबिर सेवा सप्ताह 14 ते 20 सप्टेंबरपर्यंत आहे. उरण शहर व तालुक्यात बुधवारी (दि.16) स्वच्छता अभियान राबविण्यात आला आहे.
उरण शहरात, मोरा, भवरा तलाव परिसर, विमला तलाव परिसर, आनंद नगर, आदी ठिकाणी आदी ठिकाणी स्वच्छता अभियान, व प्लास्टिक मुक्ती राबविण्यात आला, या अभियानात नगरसेवक नगरसेविका, कार्यकर्ते सहकार्य मिळाले / सर्वांना कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.या अभियानात उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजप उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष निर्मला घरत, नगरसेवक राजू ठाकूर, नगरसेवक मेराज शेख, नगरसेवक नंदु लांबे, नगरसेविका रजनी कोळी, नगरसेविका आशा शेलार, नगरसेविका दमयंती म्हात्रे, नगरसेविका जानव्ही पंडीत, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेविका यास्मिन गॅस, जसिम गॅस, उदयोजक प्रकाश ठाकूर, वैभव म्हात्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper