Breaking News

नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या प्रथम  स्मृतिदिनानिमित्त लोंढे व ओझे परिवारातर्फे आणि कच्च युवक संघ व युवा नाद यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. 3) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी मुग्धाताईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पनवेल शहरातील श्री विरूपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या रक्तदान शिबिरास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, विद्या गायकवाड, रूचिता लोंढे, भाजप नेते नंदू पटवर्धन, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उद्योजक राजू गुप्ते, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, माधुरी गोसावी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, शहर अध्यक्ष राहुल जगताप, अभिषेक भोपी, चिन्मय समेळ, जितेंद्र वाघमारे, कमलाकर घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी रक्तदान केलेल्या दात्यांना मान्यवरांच्या हस्ते
प्रमाणपत्र देण्यात आले. 

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply