Breaking News

रायगडात 148 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात नव्या 148 कोरोना रुग्णांची आणि चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 221 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 34) तालुक्यातील 117, अलिबाग आठ, खालापूर सात, उरण व पेण प्रत्येकी पाच, कर्जत दोन आणि माणगाव, सुधागड, महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर सर्व मयत रुग्ण पनवेल तालुक्यातील आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 53,587 आणि मृतांची संख्या 1537 झाली आहे. 50,572 जण कोरोनामुक्त झाल्याने 1478 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …

Leave a Reply