Breaking News

ठाकरे-नाईक परिवारातील आर्थिक व्यवहार लपविले जाताहेत

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

अलिबाग ः प्रतिनिधी
आत्महत्या केलेले इंटिरीयर डिझायनर अन्वय नाईक यांचा परिवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परिवार या दोन परिवारांमध्ये आर्थिक संबंध आहेत. त्यांनी एकत्रितपणे अनेक जमिनी खरेदी केल्या आहेत. या व्यवहारांसंदर्भातील माहिती लपवली जात आहे, असा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 20) येथे पत्रकार परिषदेत केला.
ठाकरे आाणि नाईक परिवाराने मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे समुद्रकिनारी जमीन खरेदी केली आहे.  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी या जमिनीची पाहणी केली. त्यानंतर ते अलिबागमध्ये पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे सोबत उपस्थित होते.
किरीट सोमय्या यांनी सांगितले की, ठाकरे आणि नाईक परिवाराने एकत्रितपणे अनेक जागा विकत घेतल्या आहेत. त्यांनी कोर्लई येथे जागा खरेदी केली आहे. याबाबत माहिती मागितली असता, तलाठी, जिल्हाधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ठाकरे व नाईक परिवारामध्ये झालेल्या जमीन खरेदी व्यवहाराचीदेखील चौकशी केली पाहिजे, अशी मागणी या वेळी सोमय्या यांनी केली.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply