Breaking News

जनतेची फसवणूक करणार्‍या तिघाडी सरकारचा तीव्र निषेध

वाढीव वीज बिल होळी आंदोलनाला पनवेल परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी
वाढीव वीज बिलांमध्ये सवलत देऊ अशी घोषणा करणारे महाविकास आघाडी सरकार आता मात्र राज्यातील नागरिकांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे या विश्वासघातकी सरकारविरोधात भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 23) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार पनवेल परिसरातही आंदोलन करून तिघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी वाढीव वीज बिल रद्द करा अशी मागणी करतानाच ठाकरे सरकारच्या मनमानी कारभाविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर येथील नवरंग चौकात झालेल्या आंदोलनास उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक अभिमन्यू पाटील, शत्रुघ्न काकडे, निलेश बावीस्कर, नरेश ठाकूर, रामजी बेरा, हरेश केणी, नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, आरती नवघरे, खारघर सरचिटणीस किर्ती नवघरे, दीपक शिंदे, दिलीप जाधव, संजय घरत, निर्दोश केणी, किरण पाटील, संतोष शर्मा, समीर कदम, मन्सूर पटेल, अनिल साबणे, अजय माळी, सुरेश ठाकूर, संदीप एकबोटे, शुभ पाटील, पप्पू खामकर, फुलाजी ठाकूर, सनी नवघरे, अक्षय लोखंडे, दीपक खुडे, काशिनाथ घरत, जयदास तेलवणे, सचिन वास्कर, रामचंद्र जाधव, अशोक पवार, किशोर जाधव, गीता चौधरी, संध्या शारबिद्रे, बिना गोगरी, निशा सिंग, साधना पवार, चांदणी अवघडे, प्रतीक्षा कदम, अश्विनी भुवड, आशा शेडगे, सीमा खडसे, मधुमिता जेना, मुसरत अन्सारी, स्नेहल बुधाई, वैष्णवी शिंदे, आशा बोरसे, शकुंतला लवटे आदी उपस्थित होते.  
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही आंदोलन झाले. या आंदोलनात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ नेते सुनील घरत, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, संजय भोपी, किसान मोर्चाचे अशोक गायकर, अनेश ढवळे, शशिकांत शेळके, सी. सी. भगत, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेविका चारुशीला घरत, माजी नगरसेविका सिद्धिका पुंजानी, नीता माळी, नाझ हाफिज, संजय भगत, भीमराव पोवार, अमरीश मोकल, शिवाजी भगत, मनोहर मुंबईकर, संजय जैन, प्रसाद हनुमंते, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, अभिषेक भोपी, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, ज्योती देशमाने, मनीषा चिले, सपना पाटील, राखी पिंपळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवडणुकीत मतदारांना अनेक आश्वासने देणार्‍या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने आश्वासनांची कोणतीही पूर्तता न करता उलट जनतेला धारेवर धरण्याचे काम केले आहे. या महाविकास आघाडीच्या मनमानी कारभाराला राज्यातील जनता पुरती कंटाळली आहे. कोरोनामुळे नोकरी, धंदा, व्यवसायावर परिणाम झाले असताना राज्य सरकारने वीज वाढीव देयके देऊन ग्राहकांना वेठीस धरले आहे.  
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिले ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे.
कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असे म्हटले आहे. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी आणि वीज बिल सवलतीसाठी भाजपने जनहितार्थ राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरकारने जनतेचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते, मात्र ठाकरे सरकारमध्ये सत्तेसाठी सारे काहीही असे चालले असल्याने जनतेत राज्य सरकारबद्दल दिवसेंदिवस रोष वाढला आहे, तर दुसरीकडे जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम भाजप करीत आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply