Breaking News

चला करूया वृक्षारोपण!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अभियाना शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर हे अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी येथील आयकर भवनजवळ करण्यात आला.
या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती क सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नगरसेविका सीता पाटील,  युवा नेते दशरथ म्हात्रे, शशिकांत शेळके, मोतीलाल कोळी, संजय जैन, अ‍ॅड. चेतन जाधव, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, अभिषेक भोपी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही वसुंदरा सुंदर व्हावी यासाठी आपल्याकडून जे योगदान देता येईल त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply