Breaking News

माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ

उरण : वार्ताहर

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्यात राबविले जात आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ या कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषद यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता उरण नगरपरिषदेच्या प्रारंगणात करण्यात आले.

पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्वाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असल्या बाबतची शपथ घेण्यात आली. हा शपथविधी सोहळा सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून झाला.

या वेळी उरण नगरपरिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे, मुख्याधिकारी संतोष माळी, आरोग्य सभापती यास्मिन गॅस, नगरसेवक रवी भोईर, कौशिक शाह, नगरसेविका जानव्ही पंडीत, स्नेहल कासारे, प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नवी मुंबई : विमाका

माझी वसुंधरा अभियानांतर्गत शुक्रवारी (दि. 1) कोकण भवन येथे कोकण विभागाचे महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी  हरित शपथ दिली. या वेळी येथील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महसूल आयुक्त यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी आणि वातावरणातील प्रतिकूल बदलांना प्रतिबंधित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान हे शासकीय कार्यालयापुरते मर्यादित न राहता लोकचळवळ होणे आवश्यक आहे.  अशी शपथ कोकण भवन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली.

या वेळी (विकास) उपायुक्त गिरीश भालेराव तसेच कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटायझरचा योग्य वापर केला.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply