Breaking News

‘त्या’ खेळाडूंनी हॉटेलमध्ये खाल्ले बीफ?; बिलाचा फोटो होताोय व्हायरल

सिडनी : वृत्तसंस्था

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत मेलबर्नमध्ये झालेल्या तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत जोरदार कमबॅक केले होते, मात्र आत्मविश्वासाने भारलेला भारतीय संघ तिसर्‍या कसोटीपूर्वी वेगळ्याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे. रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंना बायो बबलचे नियम मोडल्याने आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यातच आता या खेळाडूंनी हॉटेलमध्ये बीफ खाल्ल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील एका बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच एका ट्विटर युझरने एका रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी गेलेल्या भारतीय संघातील रोहित शर्मा, रिषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांचे बिल आपण भरल्याचा दावा केला होता तसेच यादरम्यान पंत याची गळाभेट घेतल्याचाही उल्लेख केला होता, मात्र नंतर असे घडले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते मात्र हा वाद निवळला नसतानाच भारतीय खेळाडूंच्या खाण्याच्या बिलाचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे बीफच्या बिलाची रक्कमही जोडण्यात आली आहे, मात्र बीफची रक्कम बिलामध्ये चुकून जोडण्यात आली आहे की हे बिल अन्य कुणाचे आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर रोहित शर्मा आणि बीफचे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहे. यावरून काही लोकांनी रोहित शर्मा आणि त्याच्या सहकार्‍यांवर टीका केली, तर काही जणांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply