Breaking News

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

बेलवलीतील शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीपासून लागलेली गळती सुरूच असून, सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत अनेक सक्रिय कार्यकर्ते शेकापला राम राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील शेकापच्या अनेक कायर्कर्त्यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले आहे. या सर्वांचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व आणि विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून बेलवलीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह माजी सरपंच भरत पाटील, भाजप गाव अध्यक्ष संतोष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाटील, माजी सदस्य अरुण पवार, संतोष चोरघे, नारायण भोपी, काशिनाथ पाटील, विक्रांत पाटील, संतोष पाटील, योगेश पाटील, बाळाराम पाटील, अंबाजी चोरघे, दत्ता पाटील, पांडुरंग वारगडा, माया वाघ, अशोक साळुंखे आदी उपस्थित होते.
या वेळी दिनेश बाळाराम पाटील, रामदास जोमा पाटील, अनंता हाशा पाटील, पांडुरंग तुकाराम पाटील, उमेश बाळाराम पाटील, हनुमान भागा पाटील, भागा बेंडू पाटील, केतन सुभाष पाटील, शुभम सुभाष पाटील, बाळाराम वेठू पाटील, रोशन रामदास पाटील, शेखर सुभाष पाटील, राजेश बबन पाटील, ज्ञानेश्वर राघो पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, सौरभ हनुमान पाटील, मनीष हनुमान पाटील, हरिश्चंद्र पद्माकर पाटील, देहू तुकाराम पाटील, अक्षय देहू पाटील, निवृत्तू काशिनाथ पाटील, प्रदीप रघुनाथ पाटील, दिगंबर काशिनाथ पाटील, प्रशांत जानू पाटील, प्रवीण जानू पाटील, मयूर बाबूराव पाटील, प्रथमेश रमेश पाटील, करण किशोर पाटील, संतोष चंदर पाटील आणि जयदास चंदर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply