Breaking News

रायगडातील 10 ग्रामपंचायती बिनविरोध

848 उमेदवारांची माघार, 1588 जण निवडणुकीच्या रिंगणात

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात होणार्‍या 88 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीपैकी 10 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता 78 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण 848 उमेदवारांनी माघार घेतली असून, 1588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पनवेल तालुक्यातील आकुर्ली, खानावले; माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपले; महाड तालुक्यातील भेलोशी, आसनपोई; श्रीवर्धन तालुक्यातील कारीवणे, म्हसळा तालुक्यातील केल्टे या ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. माणगाव तालुक्यातील देवळी व कर्जत तालुक्यातील हुमगाव या दोन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एक जागेवर उमेदवारी अर्जच भरला गेला नव्हता. त्या जागा रिक्त राहिल्या. उर्वरित सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. जिल्ह्यात एकूण 10 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होईल.  
88  ग्रामपंचायतींमध्ये 311 प्रभागांतून 840 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी एकूण दोन हजार 475 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 39 अर्ज छाननीमध्ये अर्ज अवैध ठरले, तर दोन हजार 436  उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यची अंतिम तारीख 4 जानेवारी होती. या कालावधीत अलिबाग तालुक्यात 57, पेण 69, पनवेल 252, उरण 64, कर्जत 111, रोहा 224, माणगाव 21, महाड 17, श्रीवर्धन 23, म्हसळा 10 अशा एकूण 848 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.  आता अलिबाग तालुक्यात 80, पेण 110, पनवेल 432, उरण 172, कर्जत 181, रोहा 374, माणगाव 58, महाड 76, श्रीवर्धन 73, म्हसळा 32 असे एकूण 1588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  आहेत.

Check Also

उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्‍या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण …

Leave a Reply