Breaking News

विजेच्या उघड्या डीपींना झाकणे बसविण्यास सुरुवात

नगरसेविका सुशीला घरत यांच्या मागणीला यश

पनवेल ः प्रतिनिधी

नवीन पनवेलमधील विजेच्या उघड्या डीपींना झाकणे बसविण्यास सुरुवात झाली असून, या संदर्भात महानगरपालिकेच्या प्रभाग ’ड’ सभापती सुशीला जगदिश घरत यांच्या मागणीला यश आले आहे.

या संदर्भात त्यांनी नवीन पनवेल महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. नवीन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19मधील अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज डीपी आहेत, तसेच यातील अनेक डीपी रस्त्यावर, मैदानात आणि सोसायटींच्या आवारात आहेत. अनेकदा या उघड्या डीपींमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मैदानात मुले खेळताना त्याचा धक्का लागून दुर्घटना घडू शकते.

हा संभाव्य धोका टाळण्यासाठी याकडे विशेष लक्ष देऊन डीपी झाकणाच्या साहाय्याने पूर्णपणे झाकण्यात याव्यात, अशी मागणी करून उघड्या डीपींमुळे अपघात झाल्यास त्यास महावितरण जबाबदार असेल, असाही इशारा नगरसेविका सुशीला घरत यांनी दिला होता. या कामाला आता सुरुवात झाली असून, त्याबद्दल नागरिकांकडून सुशीला घरत यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply