Breaking News

‘एसटीसारखे सुरक्षित वाहन नाही ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा’

मुरूड : प्रतिनिधी

रस्ते अपघाताचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. तथापि खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे रस्ते अपघाताचे प्रमाण अल्प आहे. एसटीसारखे सुरक्षित वाहन दुसरे नाही, ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी येथे केले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता मोहीमेचा   शुभारंभ उपनिरीक्षक सुबनावळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मुरूड एसटी आगारात झालेल्या कार्यक्रमा ते उपस्थित एसटी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करीत होते. एसटी चालकांनी सडक सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. तसेच वेग मर्यादेचे भान ठेवल्यास गाडीतील प्रवाशांचे जीव सुरक्षित राहू शकतील, असा विश्वास सुबनावळ यांनी या वेळी व्यक्त केला. दहा वर्षे विना अपघात सेवा बजावल्याबद्दल  कौरव कुडके व अंगद मुंढे या चालकांचा तसेच कार्यशाळेतील सेवातत्पर कर्मचारी भाईजान लसने व योगेश गडदे यांचा या वेळी मान्यवरांतर्फे सत्कार करण्यात आला कार्यशाळेतून गाडीचे ब्रेक तपासून पुरेशा इंधनाची खातरजमा करूनच बस मार्गस्थ करण्याचे निर्देश विभागीय अभियंता आर. एस. कांबळे यांनी दिले.चालक व वाहक एसटीचे महत्त्वाचे घटक आहेत.चालकाचा क्षणाचा निष्काळजीपणा लाख मोलाच्या प्रवाशांच्या जीवाचा खेळ होऊ शकतो. मुरुड आगाराचे अपघाताचे प्रमाण शुन्य टक्के राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी, असे आवाहन आगार व्यवस्थापक सनील वाघचौरे यांनी केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply