Breaking News

ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा तालुका अध्यक्षपदी सुरेश मगर

रोहे : प्रतिनिधी

ओबीसी संघर्ष समिती संलग्न ओबीसी जनमोर्चाची बैठक नुकतीच रोहे येथील शासकीय विश्राम गृहात झाली. या बैठकीत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा तालुकाध्यक्ष पदी सुरेश मगर यांची तर सरचिटणीस पदी महादेव सरसंबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. मात्र शासन दरबारी ओबीसी समाज फारसा दिसत नसल्याने या समाजाला न्याय मिळत नाही. त्यासाठी ओबीसी समाजाने एकत्रित येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी या वेळी केले. रायगड जिल्ह्यात ओबीसी समाजाची संघटना मजबूत करण्यासाठी सर्व समाजाचे प्रतिनिधित्व या संघटनेत येण्याची गरज आहे. यासाठी सर्व समाजाने पुढाकार घेतल्यास ओबीसी समाज बळकट होईल, असे जिल्हा ओबीसी समन्वयक उदय कठे यांनी सांगितले. या वेळी ओबीसी जनमोर्चाची रोहा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आले. त्यात उपाध्यक्ष अनंत थिटे, रामचंद्र म्हात्रे, अमोल पेणकर, उत्तम नाईक, चिटणीस मंगेश रावकर, महेश बामुगडे, संदीप चोरगे, नामदेव सुतार, खजिनदार दत्ताराम झोलगे, प्रसिद्धी प्रमुख उदय मोरे, सल्लागार काशिनाथ धाटावकर, अनंत जंगम, हरिचंद्र वाजंत्री, कार्यकारणी सदस्य सुहास खरीवले, प्रफुल्ल पडवळ, जिल्हा कार्यकारणी सदस्य शंकरराव म्हसकर, शिवराम शिंदे, शिवराम महाबळे, मधुकर पाटील, संतोष खटावकर, आदींचा समावेश आहे. तर रोहा तालुका संपर्कप्रमुख म्हणून रोहिदास दुसार, डॉ. सागर सानप, डॉ. मंगेश सानप, महेश शिर्के, किरण डिके, अ‍ॅड.  मंगेश हुमणे, माधव आग्री, अशोक करंजे यांची निवड करण्यात आली.

Check Also

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे …

Leave a Reply