पनवेल : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आणि टपाल नाका येथील अर्धाकृती पुतळ्यास भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती मोनिका महानवर, विविध प्रभाग समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, विठ्ठल डाके, संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, वंदना गुळवे, वाहतूक पोलीस निरीक्षक मोहिते, शिवजयंती उत्त्सव समितीचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. सर्वांनी शिवरायांना अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त पुर्णाकृती पुतळ्याजवळ सुमेध भालेराव या 10 वर्षांच्या मुलाचे शिवव्याख्यान झाले.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper