Breaking News

इंग्लंडचा बांगलादेशवर 8 गडी राखून विजय

आबुधाबी : वृत्तसंस्था

इंग्लंडने बांगलादेशवर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. इंग्लंडचा सुपर 12 फेरीतील सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे उपांत्य फेरीतील आशा वाढल्या आहेत. तर बांगलादेशचा पुढचा प्रवास बिकट झाला आहे. बांगलादेशनं इंग्लंडसमोर विजयासाठी 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशनं 20 षटकात 9 गडी गमवून 124 धावा केल्या होत्या. हे आव्हान इंग्लंडनं 15 षटकात दोन गडी गमवून पूर्ण केलं. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉस बटलर जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र संघाच्या 39 धावा असताना जोस बटलरच्या रुपाने इंग्लंडला पहिला धक्का बसला. त्यानंतर जेसन रॉयला डेविड मलानची साथ मिळाली. दुसर्‍या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी खेळी केली. जेसन रॉय 38 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्याने या खेळात 5 चौकार आणि 3 षटकार मारले. तिथपर्यंत विजय दृष्टीक्षेपात आला होता. बांगलादेशने पहिल्या 10 षटकात 3 गडी गमवून धावा केल्या आहेत. बांगलादेशला तिसर्‍या षटकात दोन धक्के बसले. मोइन अलीच्या सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद झाले. लिटन दास आणि मोहम्मद नइम बाद झाल्याने संघावर दडपण आलं. लिटनने 8 चेंडूत 9 तर मोहम्मद नइमने 7 चेंडूत 5 धावा केल्या. यानंतर मैदानात आलेला शाकिब अल हसनही तग धरू शकला नाही. ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर अदिल राशीदने त्याचा झेल घेतला. संघाची अवस्था बिकट असताना मुशफिकुर आणि महमुद्दुल्लाह यांनी डाव सावरला. मात्र दोघांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं. मुशफिकुर रहिम 29 धावांवर असताना लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानतर लगेचच होसैन 5 धावा करून तंबूत परतला. महमुद्दुल्ला 19, नुरुल हसन 16, महेदी हसन 11, मुस्तफिझुर रहमान 0 अशी धावसंख्या करून बाद झाले. 

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply