Breaking News

माजी जि. प. सदस्य अनिल नलावडे भाजपमध्ये

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांकडून स्वागत

पोलादपूर ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल नलावडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी नलावडे यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, शहराध्यक्ष राजा दीक्षित, भाजपचे नेते राजू धुमाळ, तालुका सरचिटणीस पंकज बुटाला, शहर संघटक माई तथा उज्ज्वला जयंत शेठ, तनुजा भागवत, सचिन बुटाला, जयेश जगताप, मंगेश शिंदे, एकनाथ कासुर्डे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस महेश निकम उपस्थित होते.
रावमराठा समाज सेवा संघाच्या माध्यमातून नलावडे यांची सामाजिक नाळ जोडली असून, पोलादपूर पंचायत समितीच्या आमसभेपूर्वीच्या व्यूहरचना करून आमसभा गाजविण्याचा अनिल नलावडे यांचा हातखंडा आहे. त्यांना लवकरच उचित जबाबदारी देण्यात येईल, असे या वेळी दरेकर यांनी सांगितले.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply