Breaking News

शार्दुल ठाकूरला मिळाली महिंद्रांनी गिफ्ट केलेली गाडी

मुंबई ः प्रतिनिधी

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट म्हणून पाठवलेली दमदार थार एसयूव्ही गुरुवारी (दि. 1) मिळाली. याबद्दल शार्दुलने महिंद्रा यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत.

अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू जायबंदी असताना ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभवाचे पाणी पाजणार्‍या टीम इंडियातील सहा युवा खेळाडूंच्या कामगिरीवर उद्योगपती आनंद महिंद्रा भलतेच खूश झाले होते आणि त्यांनी या तरुण खेळाडूंना एक शानदार गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतात येताच आनंद महिंद्रा यांनी आपल्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीची ढासू ऑफ रोडर एसयूव्ही थार ही गाडी टीम इंडियाच्या सहा तरुण खेळाडूंना गिफ्ट म्हणून देणार असल्याचे जाहीर केले होते. तो शब्द त्यांनी पाळला आहे.

शार्दूलनेही महिंद्रांकडून थार गिफ्ट मिळाल्याची माहिती दिली. ‘नवीन महिंद्रा थार आली… महिंद्राने खरंच अत्यंत जबरदस्त गाडी बनवलीये… ही एसयूव्ही चालवायला मजा येईल… खूप आनंद झालाय. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील आमच्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार श्री आनंद महिंद्राजी,’ अशी कृतज्ञता शार्दुलने महिंद्रा यांच्याप्रती व्यक्त केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply