Breaking News

तलवारबाजपटू रिद्धी पाटीलचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यातील तलवारबाजपटू रिद्धी पाटील हिने 24 ते 26 मार्चदरम्यान ओडिशातील कटक येथे झालेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सहभाग घेतला आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सेबर या प्रकारात कांस्यपदक मिळवले. याद्वारे तिने रायगड जिल्ह्यास पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला.

याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रिद्धीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रशिक्षक वैभव पेटकर, मार्गदर्शक मिलिंद ठाकूर, प्रशांत भगत आणि पालक उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply