Breaking News

कारवाईसाठी पोलिसांचे वेषांतर; पनवेल परिसरात विनाकारण फिरणार्यांकडून दंडवसुली

पनवेल : वार्ताहर

राज्यात कडक निर्बंधाची घोषणा करूनदेखील, विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या तसेच क्रिकेट, व्हॉलीबालसारखे खेळ खेळणार्‍यांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अनेक वेळा गणवेशात पोलीस कारवाई करण्यास आल्यावर नागरिक पळापळ करतात. त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही हे टाळण्यासाठी आता पोलिसांनी खासगी वाहनांमध्ये, तसेच वेषांतर करून सकाळी संध्याकाळी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, खारघर, कामोठा, कळंबोली, कामोठे आदी पोलीस ठाण्यामार्फत आता ही कारवाई सुरू करण्यात आली आाहे. नुकतेच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे वसाहतीमधील 90 रहिवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि वयोवृद्धाचा समावेश आहे. या कारवाईनंतर अनेकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचे प्रकारदेखील घडले. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना वगळून इतर व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. असे असतानादेखील अनेक रहिवाशी विनाकारण रत्यावर फिरताना दिसून येत आहे. अशा निर्बंधाची पायमल्ली करण्यावर सध्या पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे वसाहतीमध्ये इव्हीनिग वॉकसाठी घरातून बाहेर पडणार्‍या तसेच मोकळ्या मैदानात क्रिकेट मॅच आणि व्हॉली बॉल खेळणार्‍यांना अटक करून त्याच्यावर कारवाई केली आहे. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 1 मे पर्यंत कडक निर्बधाची घोषणा केली आहे, मात्र रहिवाशी बिनदीखत रस्त्यावर फिरत आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांनी साध्या वेशात जाऊन कामोठे वसाहतीमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यावर कारवाई केली आहे. खाकी वर्दीत गेल्यानंतर रहिवाशी पळून जातात त्याच्या साठी सध्या ड्रेसमधून जाऊन ही कारवाई केली आहे.

कामोठे पोलीस ठाणे आवारात समज

जवळपास 90 हुन अधिक रहिवासीयांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये महिला आणि मुलीचा सहभाग आहे. त्या सोबत वयोवृद्धदेखील दिसत आहे. या सर्वांना कामोठे पोलीस ठाण्यात आवारात उभा करून त्यांना समज देण्यात आला, तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून 500 रुपयांचा दंडदेखील वसूल केला आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply