Breaking News

सुरेश रैनाच्या नावे चौकारांचा विक्रम

चौथ्या स्थानी झेप

मुंबई ः प्रतिनिधी

चेन्नई सुपर किंग्जमधून खेळत असलेला आणि मिस्टर आयपीएल म्हणून ख्याती असलेल्या सुरेश रैनाच्या नावावर आणखी एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 चेंडूंत 17 धावा केल्या. त्यात त्याने 3 चौकार लगावले. त्याच्या या 3 चौकारांमुळे त्याच्या नावावर 500 चौकार झाले आहेत. आयपीएल कारकिर्दीत 500 चौकार मारणार्‍या खेळाडूंच्या यादीत त्याला स्थान मिळाले असून तो चौथ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत दिल्लीचा शिखर धवन आघाडीवर आहे. त्याने 182 सामन्यांत 624 चौकार मारले आहेत. सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर या यादीत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने 148 सामन्यांत 525 चौकार मारले आहेत, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली या यादीत तिसर्‍या स्थानावर आहे. त्याने 198 सामन्यांत 521 चौकार ठोकले आहेत, तर या यादीत आता सुरेश रैनाचा समावेश झाला असून तो चौथ्या स्थानावर आहे. त्याने 199 सामन्यांत 502 चौकार मारले आहेत.

सुरेश रैनाने नुकतीच आयपीएलमध्ये 200 षटकार मारल्याची नोंद केली आहे. 200 षटकार मारणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे, तर भारताचा चौथा फलंदाज आहे. या यादीत ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली आणि किरोन पोलार्ड आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply