Breaking News

मुंबई प्रीमिअर लीग टी-20 लांबणीवर

अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांची माहिती

मुंबई ः प्रतिनिधी

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई प्रीमिअर लीग टी-20 मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील व मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला. पुढील आदेश येईपर्यंत मुंबई प्रीमिअर लीग मालिका पुढे ढकलत असल्याचे पत्रक त्यांनी जारी केले आहे.

देशातील सध्याची कोरोना स्थिती पाहता सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई क्रिकेट लीगचे 3 पर्व पुढे ढकलत आहोत. पुढचा निर्णय येईपर्यंत हा आदेश लागू राहील, असे ट्विट केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे, तर आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण आणि सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे मिलिंद नार्वेकर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

डिसेंबर 2020पासून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमिअर लीग गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती, मात्र सध्याची कोरोना स्थिती पाहता ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply