Breaking News

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध

आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन

उपजिल्हा रुग्णालयाला आमदार निधीतून वैद्यकीय साहित्याची भेट

पेण : प्रतिनिधी

सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा आणि उपचार मिळावेत यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे केले.

रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण उपजिल्हा रुग्णालयाला पाच लाख 92 हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वैद्यकीय साहित्याचा चांगल्या प्रकारे वापर करून डॉक्टर व कर्मचार्‍यांनी गोरगरीब जनतेला सेवा द्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी या वेळी केले.

या वेळी उपजिल्हा रुग्णालयाला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 250 पीपीई किट्स, तीन व्हीलचेअर, तीन नेब्यूलाइजर मशीन, तीन स्ट्रेचर असे एकूण पाच लाख 92 हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले. वाशी (ता. पेण) आणि जांभूळपाडा (ता. सुधागड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्व सोयीसुविधांयुक्त प्रत्येकी एक रुग्णवाहिका दाखल होणार असून 53 लाख 55 हजार 470 रुपयांची औषधे, गोळ्या व आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी सांगितले.

 पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती दर्शन बाफणा, नगरसेविका अश्विनी शहा, नगरसेवक अजय शिरसागर, माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, माजी सभापती प्रकाश पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, शहरप्रमुख हिमांशू कोठारी, महिला मोर्चा अध्यक्ष सुप्रिया चव्हाण, संदीप सुर्वे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये सोमवारी (दि.१५) …

Leave a Reply