
पनवेल : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा नेते दशरथ म्हात्रे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे आदी उपस्थित होते, तर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी फोनवरून प्रल्हाद केणी यांचे अभीष्टचिंतन केले.