मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 9) रात्री 11च्या सुमारास घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश आहे.
मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्री रहिवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ लहान मुले आणि तीन व्यक्ती अशा 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना ढिगार्याखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Check Also
खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …