Breaking News

पनवेलमधील सप्तसूर संगीत अकादमीच्या सूरश्री स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी

पनवेलच्या सप्तसूर संगीत अकादमीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सूरश्री 2021या स्पर्धेस उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. तीन फेर्‍यात रंगलेल्या या स्पर्धेत साडेचार वर्षांच्या अवनी ते 74 वर्षांच्या कार्तिकीताईंनी भाग घेतला. यास्पर्धेमुळे  ऑनलाइन पद्धतीने घरातूनच देशभक्तीपर प्रेरणागीतानी स्वातंत्र्य दिन साजरा झाला.  ऑनलाइन पद्धतीने तीन फेर्‍यात रंगलेल्या या स्पर्धेच्या  निमित्ताने अमेरिकेच्या गौरीताई, मध्यप्रदेशचे संजय मेन तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील सुरेल आवाज ऐकायला मिळाले. या स्पर्धेचे परीक्षण पुण्याच्या सुनेत्रा तावडे आणि मुंबईच्या माधुरी परांजपे यांनी केले. परिक्षकांनी, स्पर्धेतील गाण्याची निवड, गाणे कसे गावे, सादरीकरण, उच्चार कसे करायचे त्याबाबत मार्गदर्शन केले. पं. मेघनाथ कोल्हापुरे सर आणि सुप्रसिद्ध गझलकार ए. के.शेख यांनी स्पर्धेची तयारी कशी करावी हे सांगितले. संस्थेचे संस्थापक राहूल सोनावणे यांनी त्यांच्या गुनगुनाने से गाने तक या शब्दप्रधान गायकीच्या कार्यशाळेतील महत्त्वाच्या गोष्टी स्पर्धकांना सांगितल्या. विशेष पाहुणे विश्वविक्रमवीर विराग वानखेडे यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले. ऑनलाइन पध्दतीने रंगलेल्या या स्पर्धेतील सर्व गाणी राहूल सोनावणे सप्तसूर या यूट्यूब चॅनेलवर रसिकांना ऐकता येतील.  स्पर्धेचा निकाल : 14 वर्षांखालील गटात प्रथम श्रुती सरोदे (यवतमाळ), द्वितीय विभागून अनुरी शेंडे (रायगड) व वीर केळकर (यवतमाळ), तृतीय क्रमांक अनुष्का लोखंडे (यवतमाळ), उत्तेजनार्थ चैत्य चोखन्द्रे (यवतमाळ), विशेष पारितोषिक अवनी महाजन (जोगेश्वरी, मुंबई); 15 ते 49 वर्षे गटात प्रथम गौरी बडे (खारघर) व सई देसाई, द्वितीय स्नेहा देसाई (सायन, मुंबई), तृतीय वंदना शेलार (औरंगाबाद) व हर्षद कांबळे (कुर्ला मुंबई), उत्तेजनार्थ  निशांत गांगुर्डे (खारघर) 50 वर्षांवरील गटात प्रथम राधिका वझे (दादर, मुंबई), द्वितीय चाँद माथुर (पुणे) व विजया महाजन (जोगेश्वरी), तृतीय कार्तिकी काळे (बोरीवली, मुंबई) व  रमा गाडगीळ (पुणे), उत्तेजनार्थ  गौरी रानडे (अटलांटा) व कुंदा अरविंद (चेंबूर, मुंबई).

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply