Breaking News

महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचे खालापूर तहसीलदारांना निवेदन

खोपोली : प्रतिनिधी

भटके विमुक्त जाती जमातीच्या शासकीय पदोन्नतीमधील आरक्षण सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ खोपोली शहर भाजपच्या  भटके-विमुक्त सेल तर्फे खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन देण्यात आले.

भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, भाजप भटके-विमुक्त अध्यक्ष संतोष लोहार, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंदुलकर, सरचिटणीस विनायक माडपे, शहर चिटणीस गोपाळ बावस्कर, सोशल मीडियाचे राहुल जाधव, बूथअध्यक्ष करण यादव इत्यादी या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply