कोल्हापूर ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सातार्याच्या पावसातील सभेची आठवण करून देत दिलेल्या शब्दांवरून निशाणा साधला तसेच दसर्याला शेतकर्यांचा शिमगा करणार्या सरकारच्या मंत्र्यांचा दिवाळीला काळे झेंडे घेऊन स्वागत करा, असे आवाहन शेतकर्यांना केले. ते मंगळवारी (दि. 19)
कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे भरलेल्या 20व्या ऊस परिषदेत बोलत होते. कोल्हापूरला मोर्चा काढला, पाच दिवस उन्हातान्हात चालत आलो. दोन पोरांनी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पाय सुजलेल्या अवस्थेत मुख्यमंत्र्यांच्या दारात गेलो. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. तरी यांना पाझर फुटत नसेल तर आपण काय करायला पाहिजे, असा सवाल शेट्टींनी केला.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper