Breaking News

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रायगडात दक्षता जनजागृती अभियान

अलिबाग : प्रतिनिधी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रायगड जिल्ह्यात  दक्षता जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास 26 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून 1 नोव्हेबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी दिली.

सरकारी कार्यालयात चालणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा करण्यात आला आहे. त्याची महिती सर्वसामान्य जनतेला करून द्यावी. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कामकाज कसे चालते यांची माहिती जनतेला देणे हा या अभियानाचा हेतू आहे. यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पोलीस कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांसाठी विशेष स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, असे सुषमा सोनावणे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात चालु वर्षात लाचलुचपत विभागाने नऊ कारवाया केल्या. गेल्यावर्षी पाच कारवाया करण्यात आल्या होत्या. चार वर्षांमध्ये एकूण 34 कारवाया करण्यात आल्या. ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

सरकारी काम करण्यासाठी कुणी लाच मागत असेल तर पोलीस उपअधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड, पिंपळभाट, अलिबाग येथे प्रत्यक्ष भेटून किंवा 02141 -222331, 9702706333, 9284389289, 9730271560 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सुषमा सोनावणे यांनी केले आहे.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply