मोदींमुळेच भारत मजबूत स्थितीत; जेपी नड्डा यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी (दि. 7) पार पडली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच आपण आज कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर मात करू शकलो. कोरोना काळात लॉकडाऊन लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदींनी घेतला. लॉकडाऊमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली होती, मात्र तिला पूर्वपदावर आणण्यासाठी देखील सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले. पुढे बोलताना नड्डा म्हणाले की, कोरोना काळात सरकार कायम जनतेच्या पाठीशी उभे राहिले, लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यांत सरकारने नागरिकांना सर्व सुविधा घरपोच दिल्या. पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दिशा ठरवताना भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाची संघटना आणखी मजबूत करण्याचे उद्दिष्ट या वेळी ठेवले आहे, तसेच पूर्वेकडील राज्यात भाजपचा उदय अजून व्हायचा बाकी आहे, असे ते म्हणाले. नड्डा यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना आश्वासन दिले की, भाजप बंगालमध्ये एक नवीन कथा लिहिणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन, एस जयशंकर, अनुराग ठाकूर, मुख्तार अब्बास नक्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर नेते उपस्थित होते. त्याच वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी व्हर्च्युअली बैठकीत भाग घेतला. जेपी नड्डा यांनी करोना महामारीच्या काळात आर्थिक आव्हाने हाताळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी साथीच्या काळात कठोर परिश्रम केले आहेत. त्यांनी लॉकडाऊनसारखा ‘धाडसी निर्णय’ वेळेत घेतला आणि त्यातून उद्भवणार्‍या आर्थिक आव्हानांना अधिक चांगल्या पद्धतीने हाताळले, असे नड्डा म्हणाले. राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला संबोधित करताना नड्डा म्हणाले, लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला होता आणि लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या आत देशभरातील लोकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोविडशी लढण्यासाठी ट्रॅक-टेस्ट आणि उपचारांचा समावेश असलेली ‘थ्री टी’ पद्धत देखील लागू करण्यात आली होती. जेपी नड्डा यांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाचे मताधिक्य वाढवल्याबद्दल कौतुक केले. सार्वत्रिक निवडणुकांपासून ते पंचायत निवडणुकीपर्यंत भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. खरे तर भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये चांगले काम केले आहे आणि करत आहे. भारतातील शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी प्रगतीशील धोरणे आणि कायदे आणून देशातील शेतकर्‍यांची समृद्धी सुनिश्चित करणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव नेते आहेत, असेही जेपी नड्डा म्हणाले.

भाजप हा घराणेशाहीवर आधारित पक्ष नाही. सेवा, दृढनिश्चय आणि समर्पण या मूळ संकल्पनेशी पक्ष जोडलेला आहे. कुठल्या एका घराण्याशी पक्ष जोडलेला नाही. पक्षाच्या परंपरांना पुढे नेत कष्ट आणि परिश्रम यामुळे आपण पुढे गेलो आहोत. भाजप कार्यकर्त्यांना आगामी काळात याच विश्वासाने आणि आपलेपणाच्या भावनेने पुढे जायचे आहे.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी

लसीकरणाबाबत जगभरात प्रशंसा -निर्मला सीतारामन लसीकरण कार्यक्रमासाठी जगभर भारताचे कौतुक होत असताना, लसीकरणाबाबत विरोधकांनी पहिल्यापासून शंका पसरवली. 100 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्याबद्दल भारताने जो मार्ग अवलंबला, त्याची जगभरात प्रशंसा होत आहे. लसीकरण आणि एकूणच आरोग्यसेवा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply