Breaking News

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; रामदास गायकर आणि शशांक ठाकूर यांचा समर्थकांसह पक्षप्रवेश

पेण : प्रतिनिधी

आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन खारपाले (ता. पेण) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास गायकर आणि शशांक ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात आलेल्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल व या भागातील विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी दिली. पेण तालुक्यातील खारपाले येथील रामदास गायकर, शशांक ठाकूर, कल्पेश पाटील, यश तुरे, प्रतिक पाटील, योगेश पाटील, जयेश पाटील, सिद्धेश मढवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अ‍ॅड. प्रशांत पाटील व प्रा. लक्ष्मण जांभळे यांच्या प्रयत्नाने भाजपमध्ये प्रवेश केला.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply