Breaking News

पनवेलमध्ये विकासाचा झंझावात

महानगरपालिकेच्या विविध कामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक विभागात विकासकामे करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार्‍या तब्बल 31 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 15) झाले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, बबन मुकादम, मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, चारुशीला घरत, रूचिता लोंढे, निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर, सुहासिनी शिवणेकर, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, अतुल पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत असताना शहरांसोबतच गावांचाही विकास करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीने पनवेल नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगराध्यक्ष असल्यापासून ते आता हॅट्ट्रिक करून आमदार म्हणून काम करताना पनवेलच्या विकासात मोठी भर टाकली. त्यांच्यामुळे पनवेल विधानसभा श्रेत्रात खर्‍या अर्थाने विकासाचे पर्व आले. शहरांच्या बरोबर गावांचा विकास करण्यासाठी दूरदृष्टिकोनातून महानगरपालिकेची स्थापना झाली आणि विकासाला आणखी वेग आला. नागरिकांना अपेक्षित व शाश्वत विकास करण्याचे काम पनवेल महापालिकेतील सत्ताधारी करताना दिसत आहेत. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह नेते परेश ठाकूर आणि लोकप्रतिनिधी सतत कार्यरत असतात. त्या अनुषंगाने पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे नागरिकांकडून वाहवा मिळत आहे.
या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 14मधील साईनगर रस्ता काँक्रीटीकरण करणे (अंतिम भूखंड क्रमांक 18 ते सर्वे 797-पनपा पाण्याची टाकी ते गणेश मंदिर ते ला-मेर कॉम्प्लेक्स), आदर्श को ऑप हौसिंग सोसायटी लि.मधील अंतर्गत रस्ते व अंतिम भूखंड क्रमांक 35 ते किनारा सोसायटीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक 18मधील महापालिका अग्निशमन केंद्र इमारत ते डॉ. मौलाना आझाद चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करणे, प्रभाग 19मधील अंतिम भूखंड क्रमांक 127 अ ते 124/2 ते अंतिम भूखंड क्रमांक 139 ते म्हात्रे हॉस्पिटल ते अंतिम भूखंड क्रमांक 142 व श्री कोटीभास्कर (वृंदावन हॉटेल) ते हरी काणे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, कृष्णाळे तलावलगतचा (डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासून बालाजी मंदिर ते कर्नाळा सर्कलपर्यंत) व सहयोग नगरमधील टी आकाराचा रस्ता काँक्रीटीकरण करणे, उरण रोडवरील श्री. संताजी महाराज जगनाडे चौक ते लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटपर्यंत आरसीसी नाला बांधणे, टिळक रोड ते महात्मा फुले रोड जोडणारा तथास्तु हॉलसमोरील रस्त्यांमध्ये दोन्ही बाजूस गटार बांधणे व रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक 20मधील पोदी भागांमध्ये मलनिःस्सारण वाहिन्या टाकणे, पोदी भागांमध्ये अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे, तक्का गाव येथे मलनिःसारण वाहिन्या टाकणे, तक्का गावामध्ये अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे, काळुंद्रे येथे मलनिःसारण वाहिन्या टाकणे, भिंगारी गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गटाराचे बांधकाम करणे या जवळपास 31 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून नागरिकांकडून लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले जात आहे.

विकासासाठी भाजप कटिबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल महापालिका हद्दीतील शहरे आणि गावांचा विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. विकासकामे करताना ती शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील असो भेदभाव होत नसतो. शहरी भागासोबत महापालिका ग्रामीण भागातही कोट्यवधी रुपयांची विकासकामे करीत आहे. ती जनतेला दिसूनदेखील येत आहेत. आज झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन ही पनवेलकरांसाठी विकासाची गंगा ठरणार आहे. जनतेने आम्हाला नेहमीच प्रेम दिले आहे. अद्याप अशी अनेक कामे भविष्यात करायची आहेत, असे या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply