Breaking News

नेरळमधील शिवसैनिकांचा मनसेमध्ये प्रवेश

कर्जत : बातमीदार

नेरळ शहरातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम  झाला. या वेळी हेमंत चव्हाण, सचिन देशमुख, यासिन शेख, सचिन गायकर, जयेश भोईर, भूषण मोरे, सुरेश जामघरे, अनिष गौतम, भास्कर निर्गुडा, राहुल दरवडा, रोहन दरवडा, राकेश होला, नरेश दरवडा, इस्माईल शेख आदी शिवसैनिकांसह त्यांच्या समर्थक तरुणांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी मनसेचे अभिजित घरत, नेरळ शहर अध्यक्ष मिलिंद मिसाळ, तसेच जयवंत कराळे, किरण राऊत, स्वप्नील शेळके, ऋषिकेश पाटील, चिराग गुप्ता आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply