Breaking News

नियमांचे पालन करा; अन्यथा कारवाई

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल पोलिसांचा इशारा

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फार्महाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करू, असा इशारा पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी बैठकीत दिला.

या बैठकीमध्ये दौंडकर यांनी सूचना केल्या; त्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेता 31 डिसेंबरच्या अनुषंगाने सार्वजनिक करमणुकीचा कार्यक्रम व नियोजन करण्यास किंवा तशी प्रसिद्धी जाहिरात देऊ नये. नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.

रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात शुक्रवार (दि. 24) पासून रात्री 9:00 ते सकाळी 6:00 वा.पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.

31 डिसेंबर साजरा करत असताना कोणत्याही प्रकारे जुगार खेळताना अगर दारूचे अथवा ड्रग्स सेवन करताना मिळून आल्यास अथवा डीजे, लाऊडस्पीकर लावून मोठ्याने गोंगाट करून आजूबाजूच्या लोकांना उपद्रव करीत असताना मिळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कोरोनाचा प्रसार होऊन जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये व शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. इत्यादी महत्त्वाच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

या बैठकीसाठी फार्महाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्टचे चालक, मालक असे उपस्थित होते, तसेच उपस्थितांना सीआरपीसी 149च्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply