अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला पुण्यात प्रतिसाद

परेश ठाकूर यांची उपस्थिती

पुणे : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील पुणे केंद्रांतर्गत प्राथमिक फेरी नुकतीच झाली. नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येथे भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या यंदाच्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्रातून 108 संस्थांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेत जळगाव व नागपूर केंद्रांनंतर पुणे केंद्रासाठीची प्राथमिक फेरी 25 व 26 डिसेंबर रोजी रामकृष्ण मोरे सभागृहात रंगली.
पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत 18 एकांकिका संस्थांनी सहभाग घेत प्रतिसाद लाभला. या वेळी स्पर्धा प्रमुख गणेश जगताप, खजिनदार अमोल खेर, कार्यसमिती सदस्य अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, केंद्रप्रमुख संकेत मोडक यांनी नियोजन पाहिले, तर परीक्षक म्हणून प्रमोद शेलार व अभिजित झुंझारराव यांनी कामगिरी बजावली.
या ठिकाणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथे भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले, तर त्यांनी आयोजकांचे कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात रायगड व मुंबई या दोन केंद्रांसाठी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड केंद्रासाठी 2 जानेवारी रोजी, तर मुंबई केंद्रासाठी 6, 7, 8, 9 जानेवारी या कालावधीत प्राथमिक फेरी होईल. त्यानंतर सर्व ठिकाणच्या प्राथमिक फेर्‍यांतून 24 एकांकिकांची महाअंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. मग महाअंतिम फेरी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 28, 29, 30 जानेवारी रोजी होणार आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply