Breaking News

सुकापूरच्या उपसरपंचपदी दिवेश भगत यांची बिनविरोध निवड

पनवेल : रामप्रहर वत्त

सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दिवेश दत्तात्रय भगत यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच दिवेश भगत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच योगिता पाटील, माजी उपसरपंच आशोक पाटील, दत्तात्रय भगत, आकुर्लीचे सरपंच सचिन पाटील, माजी सरपंच आलुराम केणी, माजी उपसरपंच बुवाशेठ भगत, भाजप नेते राजेश पाटील, मोनिका खुटले, विभागिय अध्यक्ष किशोर सुरते, पाली देवद पंचायत सिमिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सदस्य महेश पाटील, चंद्रकांत पोपेटा, चेतन केणी, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, पूनम भगत, प्राची जाधव, कविता पोपेटा, ज्योती केणी, आत्माराम पाटील, सुरेश मुकादम, उदय म्हस्कर, डॉ. कृष्णा देसाई, पंकज पोपेटा, मधुकर पोपेटा, अनिकेत पाटील, हनुमंत खुटले, यतीन पाटील, प्रमोद भगत आदी उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply