Breaking News

महत्वाच्या बातम्या

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंग

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी खारघर येथील फणसवाडी येथे ट्रेकचे आयोजन केले. मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मर्यादा आल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. व्यायाम व मैदानी खेळ यापासून सुद्धा विद्यार्थी लांब होत चालल्याचे …

Read More »

खारघरमध्ये 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 15 ते 18 वयोगटातील मुलांना व मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सोमवारी (दि. 3) सुरुवात झाली. खारघरमध्ये प्रभाग क्रमांक 06 मध्ये सेक्टर 16 केपीसी शाळेत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक निलेश मनोहर बाविस्कर यांच्या उपस्थितीत झाला. पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित केपीसी शाळेत झालेल्या …

Read More »

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक, डॉ. बी. डी. आघाव  …

Read More »

नेरळमध्ये सिद्धगड बलिदान दिन : हुतात्म्यांना अभिवादन, गौरव पुरस्कारांचे वितरण

कर्जत : बातमीदार नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समितीच्या माध्यमातून रविवारी (दि. 2) सिद्धगड बलिदान दिन साजरा करण्यात आला. या वेळी हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला आमदार महेंद्र थोरवे आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला नेरळच्या सरपंच उषा पारधी यांनी पुष्पहार …

Read More »

पेणमध्ये पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार; आरोपीचा पोलीस ठाण्यात गोंधळ

पेण : प्रतिनिधी पोलीस असल्याच्या फायदा घेत विवाहित महिलेला धमकी देऊन तिच्यावर गेली सहा वर्षे शारीरिक अत्याचार करणार्‍या एका पोलीस कॉन्स्टेबलला पेण पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीने ड्युटीवर असणार्‍या पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. रायगड पोलीस दलाच्या अलिबाग …

Read More »

पोलादपूर नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी 17 उमेदवारी अर्ज

पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील 13 प्रभागांच्या मतदानानंतर दुसर्‍या टप्प्यातील चार प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि काँग्रेससोबतच भाजपने अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत आहे. प्रभाग 2मध्ये कल्पेश मोहिते (काँग्रेस), मनोज प्रजापती (शिवसेना), संभाजी  माने (भाजप), अमित भुवड (काँग्रेस) आणि साहिल जाधव …

Read More »

कर्जतमध्येही लसीकरणाला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील महाविद्यालयात जाणार्‍या 15 ते 18 वयोगटातील 6774 विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असून, त्यासाठी कर्जत तालुक्यात कशेळे, कर्जत आणि कडाव या तीन ठिकाणी सोमवारी (दि. 3) लसीकरण शिबिर घेण्यात आले. मंगळवारपासून तालुक्यात नऊ ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार असून केवळ आठ दिवसांत हे …

Read More »

रायगड जिल्ह्यात किशोरवयीन मुलांच्या लसीकरणास प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 3) किशोरवयीन (15 ते 18 वयोगट) मुलामुलींच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. त्याला युवापिढीकडून चांगला प्रतिसाद मिळाला. लसीकरण होणार असल्याने मुलामुलींनी पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. सुमारे दीड लाख मुलामुलींना याचा लाभ होणार आहे. अलिबाग येथील डोंगरे हॉलमध्ये झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात …

Read More »

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; रायगड केंद्राची प्राथमिक फेरी उत्साहात

पुणे : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील रायगड केंद्रासाठीची प्राथमिक फेरी रविवारी (दि. …

Read More »

राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे बुधवारी पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित …

Read More »