Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : नवजीवन पेझारी संघ विजेता

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे आयोजित रायगड जिल्हा पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नवजीवन क्रीडा मंडळ पेझारी संघाने विजेतेपद पटाकावले. ज्ञानेश्वर क्रीडा मंडळ कोळवे संघ उपविजेता ठरला, तर बजरंग बेली आणि गणेश दिवलांग या संघांनी तृतीय क्रमांक मिळवला. नवजीवन …

Read More »

विरोधी पक्षनेते दरेकर आज रायगड दौर्यावर

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात दरेकर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये एकूण सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 21) …

Read More »

कंपनीतील स्फोटाने खोपोली हादरली

सुदैवाने जिवीत हानी नाही, मात्र नागरिकांना जाणवला त्रास खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील महिंद्रा सानियो लिमिटेड या स्टील उत्पादन करणार्‍या कारखान्यात ऑक्सिजन साठवणूक करणार्‍या टाकीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाने परिसरात खोपोली शहरात काही क्षणापुरते हादरे बसले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, मात्र स्फोटामुळे उधळलेल्या पावडरचा त्रास …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरडीपीएलचे उद्घाटन

रसायनी ः रामप्रहर वृत्त रायगड डॉक्टर्स लेदर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मोहोपाडा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीस मार्केट्स क्रिकेट ग्राऊंडवर रायगड डॉक्टर प्रीमियर लीगचे (आरडीपीएल) आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय क्रिकेट लीगचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) झाले. या वेळी रायगड डॉक्टर्स …

Read More »

विकासासाठी भाजपला सत्ता द्या -आमदार रवींद्र चव्हाण

पालीत प्रचार रॅली व सभा पाली ः प्रतिनिधी आपल्या भारत देशाला सशक्त बनवायचे असेल तर सशक्त भाजप बनवावा लागेल. या दृष्टीने परिसराचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत ते संसद सर्वत्र भाजप सत्तास्थानी येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी …

Read More »

अनिल परबच गद्दार, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना संपण्याचा डाव

रामदास कदमांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी (दि. 18) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. तेच गद्दार असून रत्नागिरीतील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी या वेळी केला. …

Read More »

सहकार चळवळ पुढे नेणार – अमित शाह

अहमदनगर ः प्रतिनिधी सहकार क्षेत्राच्या चळवळीला आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छितो. त्यामुळे येणार्‍या काळात या क्षेत्राला काहीही मदत लागली तर नरेंद्र मोदी सरकार ती देईल, असे आश्वासन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (दि. 18) दिले. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आयोजित देशातील पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर रेल्वे …

Read More »

पाकिस्तानातून आलेले चिनी बनावटीचे ड्रोन बीएसएफने पाडले

नवी दिल्ली : भारतीय सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबलेल्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांचे घुसखोरी करण्याचे प्रत्यन सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जगासमोर उघडे करणारी एक घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाने शनिवारी (दि. 18) फिरोजपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून आलेले एक ड्रोन यशस्वीरित्या पाडले. हे ड्रोन चिनी बनावटीचे असल्याचेही समोर …

Read More »

आजिवलीतील तरुणाने केले आई वडिलांचे स्वप्न साकार

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वप्नांना पंख असतात असे म्हणतात, पण त्या पंखांमध्ये मेहनतीचेही बळ असते. अशाच एका तरुणाने जिद्दीने, चिकाटीने आणि मेहनतीने आपल्या स्वप्नपंखांमुळे यशस्वी भरारी घेतली आहे. उमेश मगर या तरुणाने आपल्या आई वडिलांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचे स्वप्न स्वत:च्या वाढदिवसानिमित्त नुकतेच साकार केले. पनवेल तालुक्यातील आजिवली गावातील हा मुलगा गवंडी …

Read More »

पनवेल, उरण, नवी मुंबईत दत्त जयंती उत्साहात

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या गावदेवीपाडा येथे श्री स्वामी समर्थ मठात दत्तजयंती नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ आरती संग्रह आणि स्वामीच्या पोथीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी श्री स्वामी समर्थ मठाधिपति सुधाकर भाऊ घरत, नगरसेवक अजय बहिरा, पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, …

Read More »