Breaking News

महत्वाच्या बातम्या

मोबाइल चोरी, फसवणुकीच्या घटनांत वाढ

पनवेल, उरण, नवी मुंबईत सराईत चोर अटकेत पनवेल : वार्ताहर पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरात चोरीच्या व फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून दररोज एक ते दोन प्रकार समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत सराईत चोरांनी दहशत माजवली आहे. नागरिकांना लुटणे, मोबाइल चोरणे, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. …

Read More »

पटोले, कसे पटवले?

नाना पटोले यांनी दावा केलेल्या मोदी नावाच्या कथित गावगुंडाला नागपूरमध्ये एका वकिलाने प्रसारमाध्यमांसमोर उभे केले खरे, परंतु माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देताना या कथित गुंडाची बोबडी वळली. पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी आपणच आहोत असा दावा त्याने केला असला तरी, मोदींसंदर्भात पटोलेंनी केलेली दर्पोक्ती अंगलट येऊ लागल्याने उगाचच कुणाला तरी …

Read More »

पनवेल प्रभाग क्रमांक 19मध्ये राबविली स्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 21) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करून स्वच्छ पनवेल …

Read More »

24 जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन

‘दिबां’च्या नावासाठी कृती समितीचा वज्रनिर्धार पनवेल : हरेश साठे आता बस पुरे झाले! ‘दिबां’च्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ‘जय दिबा’ असा जयघोष करीत 24 जानेवारीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीतही सर्व शाळा 24 जानेवारीपासून सुरू

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरक्षितपणे सुरू होणार आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 21) काढला असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शाळांची घंटा 24 जानेवारीला वाजणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना …

Read More »

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा

भाजप वाहतुक सेलची तक्रार पोलादपूर : प्रतिनिधी मुंबइ-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक करताना फेरीवाल्यांचा अडथळा होत असल्याची तक्रार भाजप वाहतूक सेल पोलादपूर तालुका प्रमुख विश्वास नलावडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलादपूर नगर पंचायतीमध्ये भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ही लेखी तक्रार सादर केली आहे. पोलादपूर शहरातून अंडरपास जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय …

Read More »

पालीत संकष्ट चतुर्थीला फुलला भक्तीचा मळा

ट्रस्टचे चांगले नियोजन, व्यवसायिकांचा धंदा तेजीत पाली : प्रतिनिधी आयएसओ मानांकन प्राप्त व अष्टविनायकांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी शुक्रवारी (दि. 21) संकष्टी चतुर्थीला पालीत भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. कोविडच्या तिसर्‍या लाटेत देखील कोरोना नियमांचे पालन करीत भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शन घेताना दिसून आले. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या …

Read More »

शेडाशी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सतीश कदम विजयी

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील शेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण एक जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून सतीश रामचंद्र कदम यांना 228 मते मिळून ते विजयी झाले आहेत. शेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेसाठी प्रभाग तीनमधील पोटनिवडणुकीसाठी त्या प्रभागात भाजप, शिवसेना आणि अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात उभे होते. यामध्ये भाजपचे सतीश रामचंद्र …

Read More »

नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा

कर्जत शहर भाजपचे पोलिसांना निवेदन कर्जत : बातमीदार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. त्या अपशब्दांबद्दल नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्जत शहर भाजपच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली. नाना पटोले यांना अटक करण्याची …

Read More »

विविध मागण्यांसाठी भाजपची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांशी चर्चा

माथेरान : प्रतिनिधी एप्रिल व मे महिन्याच्या ऐन पर्यटन हंगामात पाण्याची कमतरता भासू नये आणि शारलोट लेकमधील पाण्याचा उपसा करण्यात येऊ नये या सर्वांचे नियेजन आतापासून करण्यात यावे या मागणीसाठी नवीन पनवेलचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी व कर्जतच्या उपविभागीय अधिकारी कंटे मॅडम यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. माथेरान हे दुर्गम …

Read More »