Breaking News

विवेक पाटील जेलमध्येच; 28 फेब्रुवारीला सुनावणी

पनवेल ः बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अजूनही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता 28 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात गुरुवारी (दि. 17) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड. गोन्साल्वीस उपस्थित होते. ईडी अधिकारी सुनील कुमार व्हीसीद्वारे सुनावणीच्या वेळी उपस्थित होते. विवेक पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. राहुल ठाकूर हजर होते. या वेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेल्या विनंतीमुळे न्यायालयाने पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला दुपारी 3.30 वाजता करण्याचा निर्णय घेतला.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply