Breaking News

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर आकर्षित  होऊन शिवसेना उत्तर भारतीय सेल खारघर अध्यक्ष शैलेंद्र त्रिपाठी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह रविवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष विनोद ठाकूर, उपाध्यक्ष सुमित सहाय, सोशल मीडिया सेल जिल्हा उपाध्यक्ष मोना अडवाणी, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, शिक्षक सेल संयोजक संदीप रेड्डी, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, विपूल चौटालिया, संदीप एकबोटे, मधुमिता जेना आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शिवसेना उत्तर भारतीय सेल खारघर शहर अध्यक्ष शैलेंद्र त्रिपाठी, संजय पांडे, चंद्रदेव उपाध्ये, राजेश मिश्रा, कृष्णा पांडे, शिवम, कुशवाह, सुशीला यादव, सनी महादेव, उमेश कुशवाह, पंकज पांडे, अशोक जोशी, जवाहर शहा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply