Breaking News

पोलादपुरात शिवजयंती मिरवणुकीत अफजल खान वधाचे पथनाट्य

पोलादपूर : प्रतिनिधी

येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळा तर्फे सोमवारी (दि. 21) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी पोलादपूर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शंकरराव गोपाळराव महाडीक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अफझलखान वधाच्या पोवाड्यावर आधारित पथनाट्य सादर केले. त्याचे शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक शिवप्रेमींनीही विविध देखावे सादर करून या शिवजयंती उत्सवामध्ये स्फूर्तीदायी वातावरण निर्माण केले. शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा राकेश उतेकर, सहशिक्षिका स्वाती तासतोडे, प्रणाली पालकर, भाग्यश्री वेल्हाळ, शुभदा जंगम आदींनी या अफझलखान वधाच्या पथनाट्यामध्ये सहभागी झालेल्या कृष्णा उतेकर, मनिष माळी, रिया उतेकर, श्रेयस ढवळे, हर्षद जाधव, दिक्षा साळवी, श्रेया गोळे, श्रावणी महाडीक या विद्यार्थी विद्यार्थिनींकडून तयारी करून घेतली. प्रतापगडाच्या पोवाड्याच्या ध्वनीमुद्रिकेच्या आवाजावर या विद्यार्थ्यांनी बाजारपेठेमध्ये पथनाट्य सादर केले. शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल भुवड, उपाध्यक्ष अरूण मोहिते यांच्यासह इतर सदस्य आणि शिवप्रेमी नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply