Breaking News

दिवेआगर किनारी कासव महोत्सव; पर्यटकांचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त

तालुक्यातील निसर्गरम्य दिवेआगरच्या समुद्रकिनारी कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक पर्यटकांनी हजेरी लावून या कासव महोत्सवाचा आनंद लुटला.

वनविभाग रोहा, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण व ग्रामपंचायत दिवेआगर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सागरी कासव संरक्षण व संवर्धन सुरू असलेल्या कार्यक्रमांतर्गत यावर्षीही दिवेआगर समुद्रकिनारी कासव महोत्सवाचे आयोजन करून या उपक्रमात लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्थानिक व पर्यटकांना सामावून घेण्यात आले.

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या काळात कासवाची मादी समुद्रकिनारी अंडी सोडण्यासाठी येतात. या वर्षीच्या हंगामात आजपर्यंत पाच घरट्यांमध्ये एकूण 647 अंडी मिळाली असून त्यांचे संवर्धन व संरक्षण वन विभाग, सह्याद्री निसर्गमित्र व दिवेआगर ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

समुद्री कासव संवर्धनासाठी श्रीवर्धनचे वनक्षेत्रपाल मिलिंद राऊत, बोर्ली पंचतनचे वनपाल सुनिल गुरव, वनरक्षक दिनेश गिर्‍हाने, वनरक्षक शेख बुरान शेख इसा, कासव रखवालदार मंगेश पडवळ, संतोष गुरव यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

या समुद्र कासव महोत्सवाप्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी व शेकडो पर्यटक उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply