Breaking News

नगरसेवक राजू सोनी यांचा रहिवाशांकडून विशेष सत्कार

पनवेल ः वार्ताहर

शहरातील लोकमान्य टिळक मार्गावरील सोसायटीतील पाण्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल नगरसेवक राजू सोनी यांचा मंगळवारी (दि. 5)विशेष सत्कार यशोअनुअनंत सोसायटीच्या वतीने करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोसायटीतील रहिवाशांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. यासंदर्भात त्यांनी नगरसेवक राजू सोनी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपली कैफियत मांडली. राजू सोनी यांनी तत्काळ हा प्रश्न निकाली काढीत सोसायटीचा पाणीपुरवठा सुरळीत केला. याबद्दल सोसायटीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना राजू सोनी यांनी सांगितले की, येथील रहिवाशांना कुठलीही समस्या असल्यास त्यांनी तत्काळ माझ्याशी संपर्क साधावा. आपल्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष रामदास शेडगे, सचिव अभिजित म्हात्रे, सदस्य निशांत शेडगे, सुनील शेडगे, राजेंद्र वाणी, अतुल शहा, हितेश शहा व संग्राम शेडगे उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply