Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेल चिंचवलीत विकासकामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त ़

भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून ती पूर्णत्वास येत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक आमदार निधीतून चिंचवली येथे डांबरीकरण झालेल्या एका रस्त्याचे लोकार्पण आणि दुसर्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (18) आयोजित करण्यात आला होता. सुमारे 18 लाख रुपयांच्या या विकासकामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.

पनवेल तालुक्यातील चिंचवली ते भानघर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून 10 लाख रुपये खर्चून करण्यात आले असून हे काम पूर्ण झाले आहे तसेच आठ लाख रुपयांचा निधी वापरून चिंचवली बसथांबा ते श्रीराम मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे लोकार्पण व काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात झाले.

या शुभारंभावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नीराबाई चौधरी, माजी उपसरपंच रमेश पाटील, चंद्रा पाटील, भानघरचे सरपंच शांताराम पोपेटा, सुनील पाटील, सदस्य अनुराधा वाघमारे, दर्शना चौधरी, मंगला उसाटकर, रमेश पाटील, किशोर पाटील, गजानन पाटील, आत्माराम गवणे, मंगल पाटील, बामा शेळके, प्रकाश शेळके, तुकाराम म्हस्कर, नामदेव डुकरे, समीर गवळी, मयुर तांबडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी माजी उपसरपंच रमेश पाटील यांनी, आमच्या गावाच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खूप मोठे योगदान दिले, असे सांगून त्यांचे आभार मानले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply