Breaking News

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून तळोजातील नाल्यांची पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तळोजा फेज-1 येथील नाल्यांची सोमवारी (दि. 23) अधिकार्‍यांसह पाहणी करून आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. पावसाळ्यात पनवेल महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महापालिकेने कंबर कसली आहे. या अनुषंगाने नगर परिषद हद्दीतील नाल्यांची व ग्रामीण भागांतील नाल्यांची साफसफाईची कामे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत तसेच सिडको वसाहतींमध्येही नालेसफाईची कामे सुरु होणार आहेत. तळोजा फेज-1 येथील पाहणीवेळी स्थायी समितीचे सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, उपायुक्त सचिन पवार, भाजप नेते निर्दोश केणी, समीर कदम यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply